सांगोला विधानसभा: सांगोला हा महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात स्थित आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जात किंवा जमातीसाठी राखीव नाही. सांगोला मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस हे तीन आणि सातारा जिल्ह्यातील फलटण व माण हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.